मराठा आरक्षणासाठी तलवारी काढू ;जावळे

  • छावा संघटनेची आक्रमक भूमिका For Maratha reservation Draw the sword: Jawale

जालना : संभाजीराजे आरक्षणासाठी मूक मोर्चे काढोत किंवा आणखी काही करोत. आम्ही मात्र तलवारी काढूनच आरक्षण मिळवून दाखवणार , असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय नेते नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

आम्ही तलवारी काढून आणि रस्त्यावर उतरुनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवणार असे नानासाहेब जावळे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही राज्यभर दौरा आयोजित केला आहे.या दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन संवाद साधत आहोत. संभाजीराजे यांनी आरक्षणासाठी जहाल भूमिका घ्यावी,त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचं देखील नानासाहेब जावळे यांनी म्हटल आहे.

  • मराठा आरक्षणासाठी तलवारी काढणार
  • अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक
  • संघटनेचे केंद्रीय नेते नानासाहेब जावळे यांचा इशारा
  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर दौरा
  • कार्यकर्त्यांशी जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन संवाद
  •  संभाजीराजे यांना जहाल होण्याचे आवाहन

For Maratha reservation Draw the sword: Jawale