मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. File treason case against Nana Patole, demand of Chandrasekhar Bavankule
विशेष प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.नाना पटोले यांनी माझे विधान गावातील गावगुंड असलेल्या मोदी नामक व्यक्तीबद्दल होते,असे त्यांनी म्हटलं. मात्र, भाजप नेते यावरुन चांगलेच संतापले आहेत.
नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – बावनकुळे pic.twitter.com/sdKic2XXQ1 — Lokmat (@lokmat) January 17, 2022
नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – बावनकुळे pic.twitter.com/sdKic2XXQ1
— Lokmat (@lokmat) January 17, 2022
मोदींना मी मारू शकतो, मोदींना मी शिव्या देऊ शकतो, असे म्हणत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.तसेच, देशद्रोह करणे, पंतप्रधानांना मारण्याचं प्लॅनिंग करणे, लोकांना उकसवणे, पंतप्रधानांच्या जीवाला धोका होईल असं कर्तव्य करण्याचं काम पटोले यांनी केलंय.त्यामुळे,पोलिसांनी नाना पटोलेंवर देशद्रोहाचा आणि लोकांना उकसविण्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App