टिळक टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या सुटतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासाठी धावतात.Fearing lockdown, Mumbai workers again took to the village road
विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान अजून रुग्ण संख्या वाढली तर लॉकडाऊन पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे महामुंबई परिसरातील अनेक मजुरांनी पुन्हा गावाचा रस्ता धरला आहे.त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशात जाणाऱ्या गाड्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
टिळक टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या सुटतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासाठी धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टिळक टर्मिनस, कल्याण, पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.
याआधी काेराेनाच्या संसर्गामुळे लागू केलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये मजूर-कामगारांचे प्रचंड हाल झाले.आधीच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. हाती काम नसल्याने उपासमार झाली.
वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध नसल्याने अनेकांनी आठवडाभर पायी चालत गाव गाठले.अवैध वाहनांमधून प्रवास करताना झालेल्या अपघातांत अनेक मजुरांनी जीव गमावला.आता परत तेच दिवस पुन्हा नकाेत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App