ऑनलाइन मागवलेल्या चाकूचा धाक दाखवून पिंपरीत डिलिव्हरी बॉयलाच जागीच लुटले ;१९५० रुपयांचा माल लंपास


वृत्तसंस्था

पुणे : पिंपरीत अज्ञात व्यक्तीने स्नॅपडीलवरून ऑनलाइनच्या माध्यमातून चाकू मागवला. त्याचाच धाक दाखवून डिलिव्हरी बॉयकडून एक हजार ९५० रुपयांचा माल जबरदस्तीने घेतला. याप्रकरणी एकाला अटक झाली आहे.  मुकाई चौकात शनिवारी दुपारी ही घटना घडली.Fear of knives ordered online The delivery boy was robbed on the spot in Pimpri;Goods worth Rs

विनोद लकुमन ललवाणी (वय ४३, रा. तळेगाव दाभाडे) यांनी देहूरोड ठाण्यात फिर्याद दिली. कुणाल सुभाषचंद्र वाल्मीकी (वय २१, रा. देहूरोड), याला अटक झाली आहे. त्याच्यासह एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.कुणाल याने स्नॅपडीलवरून ऑनलाईन चाकू मागवला. ते पार्सल घेऊन ललवाणी मुकाई चौकात आले. त्यावेळी कुणाल तेथे रिक्षातून आला. त्याच्याकडून पार्सल घेऊन ते उघडले. पार्सलमधील चाकू काढून त्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली. ललवाणी यांच्याकडून १ हजार ९५० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेला.

Fear of knives ordered online The delivery boy was robbed on the spot in Pimpri;Goods worth Rs

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण