नवाब मलिकांच्या या प्रकरणांचे पुरावे मी सांगितल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांना देखील त्यांचे मत्री काय कांड करतात हे कळू द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. FADANVIS PRESS: I will give evidence to Pawar – let them know what the minister is doing – Devendra Fadnavis! Nawab ka niqab: Look at the evidence here …
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक यांची एकूण पाच प्रकरण आहेत. नवाब मलिकांच्या या प्रकरणांचे पुरावे मी सांगितल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांना देखील त्यांचे मत्री काय कांड करतात हे कळू द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली? बॉम्बस्फोटात आपण माणसांची लक्तरं पाहिली त्याचं प्लानिंग करणारा हा शाहवली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद आहे. त्याची बहीण हसीना पारकर आणि तिचा फ्रंट मॅन खान यांच्याशी मलिक यांनी व्यवहार का केला? या दोघांनी तुम्हाला ही जमीन इतक्या स्वस्तात कवडी मोलाने का विकली? आपली संपत्ती सरकारजमा होऊ नये म्हणून विकली गेली. खरंच हा व्यवहार एवढाच झाला की काळा पैसा यात वापरला गेला? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.
सरदार शाहवली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शाहवली खान टायगर मेमनच्या ट्रेनिंगमध्ये होते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका याची रेकी त्याने केली होती. बॉम्बस्फोट होणार आहेत ही सगळी माहिती खान याच्याकडे होती. ज्या अल हुसैनी इमारतीत कारमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं त्यामध्ये याचा सहभाग होता असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App