Fadanavis Police Inquiry : ठाकरे – पवार सरकार बॅकफूटवर; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर घेणार घरी जाऊन!!

 प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या बदली घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्याची नोटिस पाठवून मुंबई पोलीस पुरते अडचणीत आले आहेत. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार देखील बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.Fadanavis Police Inquiry: Thackeray – Pawar government on backfoot; Going home to get the answer of Devendra Fadnavis

कारण विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर प्रिव्हिलेज आहे. माहिती कोणी पुरवली ह्याचा सोर्स सांगण्याची कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावर नाही. तरी देखील मुंबई पोलिसांनी त्यांना गोपनीय कायद्याचा भंग केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.



या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पाऊल उचलत आपण स्वतःच उद्या बीकेसीतल्या सायबर ठाण्यात जाऊन जबाब नोंदविणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या निमित्ताने फडणवीसांबरोबर भाजप कार्यकर्त्यांनी देखील बीकेसी सायबर ठाण्यात त्या परिसरात मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची योजना आखली.

भाजपची शक्तिप्रदर्शनाची योजना लक्षात येताच ठाकरे – पवार सरकार बॅकफूटवर गेले आणि सरकारच्या गृह मंत्रालयाने असा निर्णय घेतला की देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर त्यांच्या घरी जाऊन घ्यायचे. त्यामुळे उद्या वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या “सागर” बंगल्यावर जाऊन त्यांचे उत्तर घेणार आहेत. या निर्णयाची बातमी झी 24 तास या वृत्तसंस्थेने दिली आहे.

पण एकूण देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे ठाकरे – पवार सरकार पुरते बॅकफूटवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

राऊतांनी हात झटकले

या संदर्भात दुपारीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी देखील बचावात्मक पवित्रा घेत देवेंद्र फडणवीस यांना माहिती घेण्यासाठी बोलावले असेल. त्यांच्यावर कारवाईसाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी पोलिसांनी बोलावले नसेल, असे म्हटले होते. तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हा विषय सरकारचा आहे, असे सांगून हात झटकून टाकले होते. तेव्हाच फडणवीसांना चौकशीला बोलवून ठाकरे – पवार सरकारने कायदेशीर चूक केल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यापुढे जाऊन ठाकरे – पवार सरकारने बॅकफूटवर येत फडणवीसांच्या घरी पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून त्यांचे उत्तर घेण्याचे निश्चित केले असल्याचे झी 24 तासच्या बातम्या म्हटले आहे.

पवार जसे ईडीकडे जाणार होते…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न टाकलेल्या राजकीय पावलावर उद्या देवेंद्र फडणवीस पाऊल टाकणार होते…!! शरद पवार जसे सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे जाणार होते, तसे उद्या देवेंद्र फडणवीस मात्र प्रत्यक्षात मुंबई पोलिसांकडे जाणार असल्याचे सांगितले होते.

 ईडीची न आलेली नोटीस

शरद पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात प्रत्यक्ष ईडीची नोटीस आली नव्हती. पण ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी ईडीची नोटीस आली नसताना शरद पवार यांनी मी स्वतःच उठून ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करून घेतो, असे जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली होती.

शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करून घेणार आणि कायदा व्यवस्थेचा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार, अशी भीती त्यावेळच्या पोलिसांना वाटली. कारण शरद पवार यांना न आलेल्या ईडीच्या नोटिशीचा निरोप महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांनी मुंबईत ते करण्याची तयारी चालवली होती.

झाकली मुठ सव्वा लाखाची

या पार्श्वभूमीवर अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे शरद पवार यांना स्वतः “सिल्वर ओक” येथे जाऊन भेटले आणि ईडीची नोटीस त्यांना आलेले नाही तर त्यांनी ईडी मच्या कार्यालयात जाऊ नये. ते गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी विनंती केली होती. पोलिस आयुक्तांची विनंती मान्य करून शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणे रद्द केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन देखील “झाकली मुठ सव्वा लाखाची” राहिली होती.

फडणवीसही जाणार होते

पवारांसारखेच देवेंद्र फडणवीसही मुंबई पोलिसांना उत्तर देण्यासाठी बीकेसी सायबर ठाण्यात जाणार होते. तेव्हा बीकेसी परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वतः त्याची माहिती दिली होती.

भाजपचे शक्तिप्रदर्शन

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले होते, की मुंबई पोलिसांनी आपल्याकडे बदली घोटाळ्याची माहिती कशी आली? ती जाहीर का केली? ती जाहीर करणे हा गोपनीयता कायद्याचा भंग आहे, याचे उत्तर द्या अशी नोटीस पाठविल्याची माहिती दिली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता बीकेसी सायबर ठाण्यात दाखल होणार होते. यावेळी भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन करायचे ठरवले होते.

नोटीस न देता जर शरद पवार ईडीच्या कार्यालयात जात असतील आणि राष्ट्रवादी त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करून घेत असेल तर आपण का मागे राहायचे??, असा विचार भाजपच्या नेत्यांनी केला. त्यावेळी शरद पवार ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन झाले नाही.

आता पोलिसच घरी येऊन देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवणार असल्याने ते बीकेसीच्या सायबर ठाण्यात जाणार नाहीत. त्यामुळे भाजपचे शक्तिप्रदर्शन होणार नाही असे दिसून येत आहे.

Fadanavis Police Inquiry: Thackeray – Pawar government on backfoot; Going home to get the answer of Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात