प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका पाठोपाठ एक केलेल्या 14 ट्विटला प्रत्युत्तर देताना मुंबईत 12 बाँबस्फोट झाला होता, या आपल्या खोट्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे.Fadanavis – Pawar: Sharad Pawar backs false statement of “12th bomb blast
शरद पवार हे मुस्लिमांचे लांगूलचालन करतात हा आरोप करून देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या पुष्ट्यर्थ शरद पवार मुंबईतील बॉंबस्फोटांच्या वेळी खोटे बोलल्याचा आरोप केला होता. 1993 मध्ये मुंबईत प्रत्यक्षात 11 बॉम्बस्फोट झाले असताना 12 बॉम्बस्फोट झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते, याची आठवण करून दिली होती.
यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या जुन्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप 100% खरा आहे. कारण त्यावेळी 11 बॉम्बस्फोट हिंदू वस्तीत झाले होते. त्यात सिद्धिविनायक मंदिरासारखे महत्त्वाची ठिकाणे होती. बॉम्बस्फोटात वापरलेले मटेरियल कराचीत बनत असल्याचे मला माहिती होते.
याचा अर्थ परकीय शक्तींना भारतात हिंदू-मुस्लिम दंगल घडवायची होती. त्यामुळे मी मोहम्मद अली रोड परिसरात 12 बाँबस्फोट झाल्याचे खोटे सांगितले होते. त्या वक्तव्यात त्यावेळी काही चूक नव्हती. हिंदू-मुस्लिम दंगल टाळण्यासाठी ते वक्तव्य मी केले होते, असे समर्थन शरद पवारांनी आजही केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप नवीन नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस जातिवाद जोपासत नाही. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जबाबदार पदांवर होते, असे वक्तव्य देखील शरद पवार यांनी केले आहे.
पुरंदरेंनी जेम्स लेनचे समर्थन केल्याचा दावा
त्याच वेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनचे समर्थन केल्याचा दावाही शरद पवार यांनी यावेळी केला. यासाठी त्या वेळच्या काही बातम्या त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. मात्र, त्या बातम्या कोणत्या वर्तमानपत्रात आल्या होत्या, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
मनसे आता हिंदुत्वाच्या दिशेने निघाली आहे. स्वतःच्या पक्षाचे धोरण ठरवण्याचा राज ठाकरे यांना अधिकार आहे. मात्र जनतेने त्यांच्या पक्षाविषयी धोरण गेल्या निवडणुकीत घेतले, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App