वृत्तसंस्था
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. Expulsion of MLA of Swabhimani Party
राजू शेट्टी म्हणाले की, ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला. विशेष म्हणजे भुयार यांची पक्षातून हकालपट्टी होताच, त्यांनी नाराजी व्यक्त न करता धन्यवाद ,अशा आशयाची फेसबुक पोस्ट केली.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांचा विजय झाला होता. यावेळी भाजपचे नेते आणि कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून ते विजयी झाले होते. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. तसेच त्यांनी इतर पक्षांशी जवळिक वाढवली होती. ते इतर पक्षांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता होती. त्यामुळेच त्यांची हकालपट्टी होताच त्यांनी फेसबुकवर धन्यवाद अशी पोस्ट केली. ते पक्षातील इतर नेत्यांशी फटकून वागत होते.
संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भुयार यांच्याविरुद्ध राजू शेट्टी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. भुयारी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशा बॅनर देखील कार्यकर्त्यांनी लावल्या होत्या. राजू शेट्टी यांनी भुयार यांच्या बद्दल सगळी माहिती घेतली व त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर भुयार हे अपक्ष आमदार म्हणून राहणार की इतर पक्षात प्रवेश करणार याची माहिती मिळालेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App