WATCH : फडणवीसांना आली दातृत्वाची अनुभूती, कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी जोशी काकूंनी केली दोन लाखांची मदत

EX CM And LoP Devendra Fadnavis Shares video Of Help From Joshi kaku in His Adoption programme of 100 childeren

EX CM And LoP Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री तथाप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात येत आहेत. वयाच्या नव्वदीत असलेल्या मुंबईतील जोशी काका आणि काकूंनीही फडणवीसांच्या या कामात दोन लाख रुपयांची मदत दिली. याबाबतचा अनुभव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. EX CM And LoP Devendra Fadnavis Shares video Of Help From Joshi kaku in His Adoption programme of 100 children


विशेष प्रतिनिधी

नागपूर : माजी मुख्यमंत्री तथाप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात येत आहेत. वयाच्या नव्वदीत असलेल्या मुंबईतील जोशी काका आणि काकूंनीही फडणवीसांच्या या कामात दोन लाख रुपयांची मदत दिली. याबाबतचा अनुभव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे.

जोशी काकूंचा फडणवीसांना फोन

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस!

फडणवीसांनी आपल्या फेसबुक वॉलवर याबाबतच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.. : कुणाच्या व्यथा, वेदना जाणून त्यावर प्रेमाची, वात्सल्याची फुंकर घालणारे अनेक लोक आजही समाजात आहेत आणि त्याआधारावरच मानवतेची- मानवधर्माची भींत अतिशय भक्कम उभी आहे. अशीच एक दातृत्त्वाची अनुभूती मला आली… मुंबईच्या वरळी भागात राहणार्‍या सौ. वैजयंता जोशी काकू यांची ही कथा. वैजयंताकाकू 82 वर्षांच्या. मंत्रालयातील शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या! त्यांचे पती रामदास काका जोशी, हे मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेले, त्यांच्या वयाची आज 89 वर्ष पूर्ण!
तर झाले असे की, या जोशी काका-काकूंनी अलिकडेच माझे नागपूर येथील भाषण ऐकले, ज्यात कोरोनामुळे पालकत्त्व गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. काकूंनी लगेच या उपक्रमाला मदत करण्याची तयारी दर्शविली आणि माझा शोध सुरू केला.
कुठून तरी त्यांनी भाजपा कार्यालयाचा संपर्क मिळविला आणि तेथून माझ्या कार्यालयाचा. या आणि नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून होत असलेल्या कामासाठी थोडीथोडकी नव्हे, तर दोन लाख रूपयांची मदत करण्याची तयारी दर्शविली. या मदतीचा धनादेश देण्यासाठी ते या वृद्धापकाळात येऊ शकणार नव्हते. मग व्हीडिओ कॉलवर संवाद झाला आणि त्यांच्या घरून धनादेश घेण्यास सांगितले. माझ्या सहकार्‍यांनी जाऊन तो आणला. एक प्रेमळ आशिर्वादरूपी पत्र सुद्धा त्यांनी सोबत दिले. माझ्या आईला नमस्कार आणि अमृता, दिविजा यांना भरभरून आशीर्वाद दिले. सामाजिक कार्यासाठी मदत करायला चांगले विचार असावे लागतात. जोशी काका आणि काकूंशी बोलून जे आत्मिक समाधान मिळाले, त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही!
मी एवढेच म्हणेन की, आपल्यासारख्यांच्याच आशिर्वादावर वाटचाल सुरू आहे. या दोघांचे आभार मानू तरी कोणत्या शब्दात? अशा दानशूरांच्या बाबतीत संत तुकोबाराय म्हणतात…
सेवितो हा रस वाटितो आणिका ॥ त्यांच्या दातृत्त्वाला सलाम!

EX CM And LoP Devendra Fadnavis Shares video Of Help From Joshi kaku in His Adoption programme of 100 children

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात