विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : क्षयरोग निर्मूलनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त कार्यक्रम आहे आणि आम्हाला शासकीय यंत्रणेकडून अपेक्षा आहे की ज्या पद्ध्तीने त्यांनी कोविड-19 शी लढा दिला त्याच पद्धतीने क्षयरोग निर्मूलनाचे काम यशस्वीरीत्या पार पाडतील, असे प्रतिपादन आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. Everyone should cooperate in eradicating tuberculosis; Appeal by Health Minister Rajesh Tope
औरंगाबाद महानगरपालिका यांचे कैलाशनगर येथील शहर क्षयरोग केंद्र कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. क्षयरोग रुग्णांचे उपचार व त्यांना देण्यात येणारी सवलतींची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ते म्हणाले. टीबी रुग्णांना मोफत उपचार, मोफत चाचण्या आणि पोषण आहारासाठी देण्यात येणारी रक्कम आशा सवलतींची जास्तीत जास्त जनजागृती करण्याची सूचना त्यांनी यावेळी केले. ज्या पद्धतीने कोविड रुग्णांचे उपचार करण्यात येते त्याच पद्धतीने टीबी रुग्णांचे उपचार करावे लागते.
रुग्णासोबत राहणारे नातेवाईक यांची देखील चाचण्या करावी लागते याबाबत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. क्षयरोग केंद्रासाठी वापरण्यात आलेली निधीची रक्कम आणि कार्यालयाचे कामाबाबत समाधान व्यक्त केले. सदरील केंद्रावर ज्या मशीन आहेत ते कमी पडतील अशी माहिती मिळाल्यावर श्री टोपे यांनी अधिक मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सदरील कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने,अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर सर्व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंडलेचा यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ पाडळकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ खैरे यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App