वृत्तसंस्था
नवी दिल्ली – काँग्रेसच्या कायमस्वरूपी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया २१ ऑगस्ट २०२१ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविली जाईल, असा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने आज घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.Election of the AICC president will be held between 21st August 2022 and 20th September 2022
काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सर्व स्तरांवर राजकीय तत्वप्रणालीचे प्रशिक्षण वर्ग देशभर घेण्यात येतील. काँग्रेसचे तत्त्वज्ञान, धोरणे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून समाजाच्या अपेक्षा यांची माहिती कार्यकर्त्यांना या प्रशिक्षण वर्गांमध्ये देण्यात येईल, अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
Election of the AICC president will be held between 21st August 2022 and 20th September 2022: Congress general secretary KC Venugopal — ANI (@ANI) October 16, 2021
Election of the AICC president will be held between 21st August 2022 and 20th September 2022: Congress general secretary KC Venugopal
— ANI (@ANI) October 16, 2021
We passed 3 resolutions – on the political situation, on inflation and on acute agrarian distress and diabolical attack on India's farmers: KC Venugopal, Congress general secretary after CWC meeting pic.twitter.com/qIGIBGS3jq — ANI (@ANI) October 16, 2021
We passed 3 resolutions – on the political situation, on inflation and on acute agrarian distress and diabolical attack on India's farmers: KC Venugopal, Congress general secretary after CWC meeting pic.twitter.com/qIGIBGS3jq
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये राजकीय ठराव, महागाई विरोधातील ठराव आणि देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी ठराव यांचा समावेश आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात देशात प्रचंड असंतोष आहे कारण मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, याकडे वेणुगोपाल यांनी लक्ष वेधले. काँग्रेस कार्यकारिणीने निर्णय घेतल्यानुसार पुढील वर्षी ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये ज्या अर्थी पूर्णवेळ अध्यक्षांची निवडणूक होणार आहे, त्या अर्थी तोपर्यंत पंजाब, उत्तर प्रदेशासह ५ राज्यांच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्या निवडणूकीत काँग्रेसचा राजकीय परफॉर्मन्स कसा राहतो, त्याचे प्रतिबिंब काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणूकीत पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी विचार करू, या शब्दांमध्ये स्वतः अध्यक्ष होण्याबाबत विधान केल्याने काँग्रेस नेत्यांना आशा निर्माण झाली आहे.
पण उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकीचे निकाल कसे लागतात, यावर काँग्रेसमधले देखील राजकीय संतुलन बदलू शकते, अशी चिन्हे आहेत.
Election of the AICC president will be held between 21st August 2022 and 20th September 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App