शिंदे – चव्हाण ठरले भारी, अजितदादांचा निर्णय माघारी; मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग रचनेनुसार निवडणूक


प्रतिनिधी

मुंबई – ठाकरे – पवार सरकारने आधी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वॉर्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या घेण्यात आला आहे. हा या निर्णय राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय धक्का मानला जात आहे. हा धक्का शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी एकत्र येऊन दिल्याचे मानण्यात येत आहे. eknath shinde and ashok chavan pushed back ajit pawar over muncipal elections

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मिनी विधानसभा अर्थात 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपुरात भाजपची एकहाती सत्ता आली होती. पण राज्यात ठाकरे – पवार सरकार सत्तेवर येताच कायद्यात बदल करून पुन्हा एक सदस्यीय वॉर्ड पद्धती अमलात आणली. यासाठी दस्तुरखुद्द अजित पवारांनी पुढाकार घेऊन प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीने गमावल्यानंतर अजितदादांना हा निर्णय घेणे महत्त्वाचे वाटत होते.

त्यामुळे सत्तेवर येताच अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात हा सिंगल वॉर्ड रचनेचा निर्णय घेतला होता. पण, २०२२ च्या फेब्रुवारीत महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्याआधी ठाकरे – पवार सरकारने प्रभाग रचनेत बदल करण्याचा आपलाच निर्णय रद्द केला आहे. या निर्णयाचा आता भाजपला फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • असा आहे निर्णय
  •  मुंबई महापालिका 1 वॉर्ड पद्धती
  •  उर्वरित महापालिका 3 सदस्य प्रभाग
  •  नगरपालिका नगर परिषद 2 सदस्य प्रभाग
  •  नगर पंचायतीला वार्ड नुसार सदस्य असतील
  •  अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आला आहे.

eknath shinde and ashok chavan pushed back ajit pawar over muncipal elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण