ED Uddhav Thackeray : हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी – ठाकरे संबंध विचारून किरीट सोमय्या कोविड घोटाळ्यात आज कोर्टात संजय राऊत – सुजीत पाटकरांवर करणार केस!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी ठाकरे परिवाराच्या थेट घरात घुसल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आणखी 6 घोटाळे बाहेर येण्याचा इशारा दिला आहे. त्याच वेळी हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी बरोबर ठाकरे परिवाराचे काय संबंध आहेत?, असा खोचक सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ED Uddhav Thackeray: Hawala King Nandkishore Chaturvedi – Sanjay Raut – Sujit Patkar will file case in court today in Kirit Somaiya Kovid scam by asking about Thackeray !!

तर त्या पलिकडे जाऊन किरीट सोमय्या यांनी नुकतेच ट्विट करून आपण कोविड घोटाळ्या संदर्भात संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या विरोधात मॅजिस्ट्रेट कोर्टात केस दाखल करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत, सुजीत पाटकर आणि मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कोविड हॉस्पिटल उभारणी संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता किरीट सोमय्या हे या घोटाळ्यासंदर्भात आज बुधवारी दुपारी 2.45 वाजता मॅजिस्ट्रेट कोर्टात केस दाखल करणार आहेत. ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार असल्याचा इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले

  • – श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून ३० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. गेल्या ईडीला गेल्या दीड वर्षात कोट्यवधींची माहिती दिली आहे.सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे.
  • – उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय आहेत? हे माझे वाक्य संपल्याबरोबर उद्धव ठाकरेंची माफिया सेना लगेच बोंबाबोंब सुरु करणार. याआधी मी असाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचा संबंध काय?
  • – ठाकरेंनी त्यांचे आणि परिवाराचे आर्थिक व्यवहार, व्यवसायिक संबंध सांगितले तर किरीट सोमय्या, ईडी किंवा न्यायालयाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. १९ बंगले लपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. पण खरं बाहेर आले. २०१९ मध्ये रश्मी उद्धव ठाकरे बंगले माझे आहे सांगतात आणि २०२१ मध्ये उद्धव ठाकरे बंगलेच नाही सांगतात. पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यातील आर्थिक संबंध व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?
  • – जे शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लाँड्रिंग केलं त्यासंबंधी ठाकरे परिवार माहिती देणार की मलाच द्यावी लागणार? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी बनवली होती. यामध्ये आदित्य ठाकरे मालक आणि संचालक होते. ५० % त्यांचे आणि ५० % रश्मी ठाकरेंची मालकी होती. ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वैदीच्या मालकीची आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे परिवाराने जी कंपनी बनवली होती ती नंदकिशोर चतुर्वेदींना दिली का?
  • – नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्यांची कंपनी ठाकरे कुटुंबाने तयार केली आहे. ती कंपनी कधी, कशी आणि का दिली? नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? ठाकरे परिवाराचा हा पहिलाच मनी लाँड्रिंग व्यवहार आहे का? यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे.

– ६ कोटी ४५ लाखांच्या मालमत्तेवर टाच

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़ या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे.

– पुष्पक बुलियनवर कारवाई

पुष्पक बुलियन प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आह़े. याआधी ‘ईडी’ने ६ मार्च २०१७ रोजी पुष्पक बुलियन समूह कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी ईडीने पुष्पक बुलियनच्या २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टाच आणली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीशी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे ‘ईडी’च्या निदर्शनास आले. त्यानंतर या कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली.

पुष्पक समूह महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आहे. पुष्पक रियल्टीमध्ये गुंतवलेली रक्कम महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदीच्या माध्यमातून काढून घेतल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आले. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली २० कोटी दोन लाख रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना दिले.

अनेक बनावट कंपन्या

अनेक बनावट कंपन्या चालवणाऱ्या नंदकिशोर चतुर्वेदी यांनी पुढे मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विनातारण (असुरक्षित) कर्जस्वरूपात दिली. अशा पद्धतीने गैरव्यवहारातील रकमेचा श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या गृहप्रकल्पात वापर झाल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आले.

पुष्पक बुलियन प्रकरण काय आहे?

नोटाबंदीच्या काळात २८५ किलो सोन्याची खरेदी केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०१७ मध्ये पुष्पक बुलियनविरोधात गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्स प्रा. लिमिटेड कंपनीचे चंद्रकांत पटेल यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केले होते. त्याची किंमत ८४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या प्रकरणाच्या तपासात पीहू गोल्ड आणि साटम ज्वेलर्स यांच्या खात्यामध्ये ४१ दिवसांत मोठय़ा प्रमाणात रक्कम जमा केल्याचे उघड झाले होते. पुष्पक बुलियन्सचे खाते बँकेने ‘नॉन प्रॉफिट असेट्स’ म्हणून जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या खात्यातून व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

ED Uddhav Thackeray : Hawala King Nandkishore Chaturvedi – Sanjay Raut – Sujit Patkar will file case in court today in Kirit Somaiya Kovid scam by asking about Thackeray !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात