विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मेहुण्यावर सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्या कंपनीच्या ११ सदानिका जप्त करण्यात आल्या आहेत. यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधक या मुद्द्यावरून टीका करत असताना सत्ताधारी मात्र केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ED Thackeray – Patankar on thackeray manase tweet ED
अशातच आता मनसेने देखील या मुद्द्यावर शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून त्यांना “दुनियादारी” सिनेमातला डायलॉग आठवल्याचे दिसतेय.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुनियादारी या मराठी चित्रपटाचा ‘मेहुणे मेहुणे, मेव्हण्यांचे पाहुणे’ हा डायलॉग ट्विट केला आहे. तसेच पाहुणे घरापर्यंत आले असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.
पाहुणे आले घरापर्यंत! pic.twitter.com/xgzydDxG1l — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 23, 2022
पाहुणे आले घरापर्यंत! pic.twitter.com/xgzydDxG1l
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 23, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. निलांबरी अपार्टमेंट प्रकरणात ईडीकडून श्रीधर पाटणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असून त्यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App