वृत्तसंस्था
मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा राऊतच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने हे समन्स जारी केले आहे. ED summons Sanjay Raut’s wife Varsha Raut for questioning tomorrow
वर्षा राऊत यांनी चौकशीसाठी उद्या शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालायत हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांच्या अडचणी संपतना दिसत नाही.
Sanjay Raut : राज ठाकरे पुन्हा म्हणाले, “लवंडे”; फडणवीस म्हणाले, “बिनकामाचे”!!
गुरूवारी संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या दरम्यान पत्राचाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावले आहे. यानंतर वर्षा राऊतांच्या खात्यावर काही व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने ही कारवाई करण्यात केली आहे.
वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँकेतून १ कोटी ६ लाख रुपये अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आणि वर्ष राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले असून त्याबाबत ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App