प्रतिनिधी
सांगली : महाराष्ट्रात 14 ठिकाणी ईडीने छापे घातले आहेत. यात राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे. 10 वर्षे जुन्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडी करीत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठ्याप्रमाणात रकमा वळत्या केल्याचा म्हणजेच मनी लाँड्रिंगचा ईडीला संशय आहे.ED raids Jayant Patal’s Rajarambapu Cooperative Bank
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या या घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा आरोप आहे. मात्र याबाबत जयंत पाटलांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ते आता काय प्रतिक्रिया देतात याकडे माध्यमांचे लक्ष आहे.
सांगलीत व्यापाऱ्यांवर छापे
दुसरीकडे सांगलीमध्ये ईडीने एकाचवेळी 5 व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहेत. आर्थिक अनियमिततेच्या कारणामुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रात्री 2.30 वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले. या 5 व्यापाऱ्याकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्यांची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली आहे.
सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेश आणि सुरेश पारेख, अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यांवर काल ईडीच्या पथकांनी छापे घालून तपासणी केली. हे अनेकांना अर्थ पुरवठा करीत होते. त्या व्यवहारात आर्थिक अनियमितता आहे, या संशयातून ईडीने हे छापे घातेल. त्याच वेळी राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयावरही ईडीने छापा घातले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App