मुश्रीफ – के. कवितांचे शक्तिप्रदर्शन; पण ईडी पुढे शक्तिप्रदर्शन करून विरोधकांचे काय साध्य होणार??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाया सक्त झाले असून राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळीच छापे पडले आहेत. संताजीराव घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्या बाबत गेले दीड महिन्यातली ही त्यांच्या घरावरची तिसरी छापे कारवाई आहे. त्याच वेळी हसन मुश्रीफ यांचे समर्थक पुन्हा एकदा त्यांच्या घरासमोर जमून शक्तिप्रदर्शन करत आहेत.ED raids Hasan Mushrif house, k. Kavita to appear before ED, both leaders showed power strength, but will it work??

तिकडे राजधानी नवी दिल्लीत दारू घोटाळ्यात चौकशी आणि तपासाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता ईडीला सामोरे जात आहेत त्याच वेळी चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानाभोवती देखील समर्थकांनी गर्दी करून शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.



काल देखील ईडीने लालूप्रसाद यादव यांची आणि त्याआधी त्यांच्या पत्नी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात चौकशी केली. तेव्हाही राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाचाच प्रयत्न केला होता.

पण मूळ मुद्दा वेगळाच आहे. एकीकडे भाजप लोकसभा हरलेल्या 160 जागांवर प्लॅनिंग करून निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे विरोधकांचा मात्र शक्तिप्रदर्शन युक्त ईडीचा झगडा सुरू आहे. या शक्तिप्रदर्शनातून विरोधक नेमके काय साधू पाहत आहेत?? यातून कायदेशीर कारवाई टळेल का?? ईडीच्या अधिकाऱ्यांवर या शक्तिप्रदर्शनाचा दबाव तरी येईल का??, हे खरे प्रश्न आहेत. ईडीचे अधिकारी छापे घालतात. तेव्हा कागदपत्रे शोधतात. विशिष्ट रकमांचे आकडे असलेली कागदपत्रे त्यांच्या हाती लागतात आणि त्याचाच ते हिशेब विचारतात. हा आतापर्यंतचा कायदेशीर अनुभव आहे. यात कोणाच्याही कामी त्यांचे शक्तिप्रदर्शन आल्याचा आतापर्यंत अनुभव नाही.

कोणीही कितीही मोठे शक्तिप्रदर्शन केले, हजारो – लाखो लोक घराभोवती, बंगल्याभोवती, हवेलीभोवती जमवले तरी ईडीने प्रश्नांना कायदेशीर उत्तरे द्यावी लागतातच आणि ईडीने खोट काढलेल्या रकमेविषयी माहिती द्यावी लागतेच. त्या कारवाईत कुठेही ढिलाई आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.

ED raids Hasan Mushrif house, k. Kavita to appear before ED, both leaders showed power strength, but will it work??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात