ED raids : दाऊदशी लागेबांधे, मंत्र्यांची चौकशी; मंत्र्यांची नावे आली? की नावे घुसवली??; कारवाईवर राऊतांचे प्रश्नचिन्ह

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या टीमने 15 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजल्यापासून कुख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या मुंबईतील घरासह इतर 10 ठिकाणी छापे घातले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) माहितीच्या आधारे हे छापे घातले जात आहेत. ईडीने घातलेल्या छाप्यांची माहिती यावेळी माध्यमांना देण्यात आलेला नाही. मुंबईत 10 ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांनी ही संयुक्त छापेमारी केल्याचे कळते. मनी लॉड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि महाविकास आघाडीतले मंत्री या प्रकरणात रडारमध्ये येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. ED raids: David’s affair, ministerial inquiry; The names of the ministers came? Inserted names ??; Raut’s question mark on action

या प्रकरणावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून मंत्र्यांची नावे ईडीच्या तपासात बाहेर आली की नंतर घुसवली?, असा सवाल केला आहे. ईडी कारवाई करत असेल आणि ती राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्नावर असेल तर केंद्र सरकारने राज्य सरकार यांच्या तपास संस्थेने एकत्र येऊन काम करावे, असे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले आहे. मात्र मंत्र्यांची नावे तपासात बाहेर आली? की घुसवली?, असा सवाल करुन त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

ईडी आणि एनआयएकडून ‘सर्च’ऑपरेशन

एनआयएने दाऊद इब्राहिमविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आधारे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. एनआयएला मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीचे पथक आज दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या मुंबईतील घरावर छापे टाकत आहे. अंमलबजावणी संचलनालयाने मुंबई आणि परिसरात अंडरवर्ल्ड गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या प्रकरणाशी संबंधित छापेमारी सुरू केली आहे. नुकतीच काही प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या संबंधित प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाशी संबंधितच ईडी आणि एनआयएचे ही छापेमारी असल्याचे समोर येत आहे.



या सर्वांची बँक खाती, मोबाईल आणि संगणक यांचाही ईडीकडून शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरला अटक करण्यात आली असून तो तळोजा कारागृहात आहे. यासोबतच ईडी आणि एनआयएची टीम दाऊद इब्राहिम टोळीला आश्रय देणाऱ्यांचाही तपास करत आहे. 12 मार्च 1993 रोजी दाऊद इब्राहिम टोळीने मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोटांची मालिका घडवली होती. तेव्हापासून दाऊद इब्राहिम देशातून फरार असून परदेशातून मुंबईसह राज्यात अशांतता पसरवत आहे.

ED raids: David’s affair, ministerial inquiry; The names of the ministers came? Inserted names ??; Raut’s question mark on action

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात