प्रतिनिधी
मुंबई : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना वरील जप्तीची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची कारवाई वैध असल्याचा निकाल कोर्टाने दिल्यानंतर ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. झी 24 तासने ही बातमी दिली आहे.ED process to take over Jarandeshwar factory begins
जरंडेश्वर कारखान्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया ईडी करत असल्याचा माहिती मिळाली आहे. सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाने मंगळवारी जरंडेश्वर कारखाना लिलावात विकत घेण्यासाठी दिल्या गेलेल्या 65 कोटी रुपयांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधावर शिक्कामोर्बत केले आहे. ईडीच्या कारवाईला वैध ठरवले आहे.
ईडीने या कारखान्यावर गतवर्षी जुलै महिन्यात जप्ती आणली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयामुळे आता ईडी कारखान्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
– गुरु कमोडिटीशी संबंध
राज्य सहकारी बॅंकेने 2012 मध्ये कमी किंमतीत या कारखान्याचा लिलाव केला, असे ईडीला आढळून आले आहे. त्यावेळी अजित पवार हे राज्य सहकारी बॅंकेचे संचालक होते. दरम्यान, गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. कारखाना विकत घेण्यासाठी या कंपनीला स्पार्कलिंक सॉईल प्रा. लि. या कंपनीकडून काही प्रमाणात रक्कम देण्यात आली होती. ही स्पार्कलिंक सॉईल प्रा. लि. ही कंपनी अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.
जरंडेश्वर कारखान्या संदर्भात किडणे कारवाई केल्यानंतर हे प्रकरण मुंबई कोर्टात गेले होते कोर्टाने जप्तीची कारवाई वरील असल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करत असल्याची माहिती मिळत आहे.
– शिखर बँक घोटाळ्यावर नजर
राज्य सहकारी बॅंकेने अनेक आजारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जप्रकरणांबाबत ईडी सध्या तपास करीत आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या 76 संचालकांवर अशा चुकीच्या कारभाराबाबत ईडीची नजर आहे. या संचालकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार अजित पवार यांच्यासह अनेक नामवंत नावे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App