वृत्तसंस्था
मुंबई : बार आणि रेस्टॉरंट चालकांकडून शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार सरकारचे ग्रह मंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ED ने पुन्हा समन्स बजावले आहे. ED Has Issued Fresh Summons To Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh And His Son Hrishikesh Deshmukh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांची केंद्राच्या तपास पथकांकडून चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे.
अनिल देशमुखांच्या मागे ‘सीबीआय’चा ससेमिरा लागून बरेच दिवस झाले आहेत. मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर नुकतीस छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती.
देशमुखांना दिलासा नाहीच!
तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App