ईडी लागली आता अनिल परबांच्या मागे, नोटीस मिळाल्याने शिवसेनेत खळबळ


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री ठाकरे यांचे सर्वांत विश्वासू अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठविल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अनिल परब यांनाही ईडीची नोटीस आली आहे. परब यांना ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ED gave notice to Anil Parab

दरम्यान, १०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल परब यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. १०० कोटींच्या वसुलीमध्ये अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.



केंद्रीयमंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी मोठी भूमिका बजावल्याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर भाजपने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सविस्तर माहिती घेऊन त्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल असे परब यांनी म्हटले आहे.

ED gave notice to Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात