विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे व खासगी सचिव संजीव पालांडे यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. देशमुख यांनाही याप्रकरणी पाच वेळा समन्स पाठवले आहे. पालांडे व शिंदे या दोघांनाही आर्थिक अपहारप्रकरणात २६ जूनला ‘ईडी’ने अटक केली होती. ED filed chargsheet against Anil Deshmukhs PA also summonsed him
सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी ६० बारमालकांच्या वतीने महेश शेट्टी व जया पुजारी यांनी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला डिसेंबर २०२० मध्ये ‘गुडलक मनी’ म्हणून ४० लाख रुपये दिले होते.
शिवाय परिमंडळ एक ते सातमधील ऑर्क्रेस्ट्रा बारमधील जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये एक कोटी ६४ लाख रुपये दिले होते. परिमंडळ आठ ते १२ मधील ऑर्केस्ट्रा मालकांनी वाझे याला दोन कोटी ६६ लाख रुपये याच कालावधीत दिले होते.
कुंदन शिंदे यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझेला एक मार्चपूर्वी ओळखत नसल्याचे ‘ईडी’ला सांगितले तर पालांडे यांनी ‘ईडी’ला दिलेल्या जबाबात चार मार्चला त्याची पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात कोरोना काळात बारवर लागू केलेल्या नियम याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले होते. ‘ईडी’ने केलेल्या दाव्यानुसार, देशमुख यांचा पोलिसांच्या बदल्यांमध्ये विशेष करून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सहभाग होता, असा जबाब पालांडे याने दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App