विशेष प्रतिनिधी
जळगाव : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस येत आहेत.त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लावण्याची भारतीय जनता पक्षाच्या राहातील नेत्यांची रणनीती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.ED, CBI action against Mahavikas Aaghadi leaders is BJP leaders’ strategy! Rohit Pawar’s claim
जळगाव येथे बोलताना रोहित पवार म्हणाले, सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या राज्यातील नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि खासदार ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आले आहे. खुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहे.
या प्रकरणावर बोलत असताना रोहित पवार यांनी नवा दावा केला आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली.
तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App