या नागरीकांनी नव वर्ष स्वागतासाठी विक्रीसाठी ही मादक द्रव्ये आणली होती.ही मादक द्रव्ये मानखुर्दच्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन विकली जात होती. Drugs worth Rs 3 crore 18 lakh seized in Mumbai; Three Nigerian nationals arrested
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांनी बांद्रा उपनगर आणि नवी मुंबई येथे छापे टाकले आहेत. दरम्यान या छाप्यात तीन नायजेरियन नागरीकांना अटक केली आहे.तसेच त्यांच्याकडून ३ कोटी १८ लाख रूपयांचे मादक द्रव्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई मुंबई पोलिसांच्या मादक द्रव्य विरोधी पथकाने केली आहे.पकडण्यात आलेले तीन नायजेरियन नागरीक हे मादक द्रव्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्य असावेत असा संशय आहे.
या नागरीकांनी नव वर्ष स्वागतासाठी विक्रीसाठी ही मादक द्रव्ये आणली होती.ही मादक द्रव्ये मानखुर्दच्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन विकली जात होती. ते त्यांच्या नियमीत विक्रीचे ठिकाण असल्याचेही या कारवाईत उघड झाले आहे. हे, तिन्ही आरोपी वाशीत राहात होते. कापडाच्या व्यापारासाठी आपण मुंबईत आलो आहोत असे सांगून ते या मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार करीत असत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App