ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणी; कमी पैशात उत्पादन वाढविणाऱ्या या उपक्रमाचं स्वागत

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देखील आता यासाठी पुढाकार घेतला. Drug spraying on sugarcane by drone; Welcome to this low cost product

कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणी करता येणार आहे.

या ड्रोन औषध फवारणीचे प्रात्यक्षिक लिंगनूर येथे शाहू कारखान्याच्या चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या उपस्थित करण्यात आलं.ड्रोन औषध फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या श्रम आणि पैशांची बचत होणार आहे.

शिवाय उसाची वाढ झाल्यानंतर मनुष्यबळाद्वारे औषध फवारणी करताना येणाऱ्या अडचणीचा सामना आता या शेतकऱ्यांना करावा लागणार नाही. शाहू कारखान्याचा कार्यक्षेत्र बरोबरच गेटकेन क्षेत्रातही हा उपक्रम राबवणार असल्याचं यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हटल आहे. कमी श्रम आणि पैशात उत्पादन वाढविणाऱ्या या उपक्रमाचं शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Drug spraying on sugarcane by drone; Welcome to this low cost product

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात