पवारांनी कन्येसह पंतप्रधानांच्या आवाहनानुसार टाळ्या – थाळ्या वाजविल्या होत्या; डॉ. विनय सहस्त्रबुध्देंकडून राज्यसभेत आवर्जून आठवण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना योध्द्यांच्या सन्मानासाठी देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कन्येने मोठी समजदारी दाखवून मुंबईत आपल्या निवासस्थानाच्या सज्जात येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजविल्या होत्या, याची आठवण राज्यसभेत भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी करवून दिली.Dr. vinay sahasrabuddhe praise sharad pawar and his daughter supriya sule for “Tali and Thali”

कोविड संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांवर सदनातील चर्चेत सहभागी होताना डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सूचकपणे विरोधकांना चिमटे काढले. ते म्हणाले, सर्व पक्षांच्या सदस्यांनी कोरोना योध्द्यांविषयी आपली कृतज्ञता प्रकट केली आहे.पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून कृतज्ञता दाखविण्याचे आवाहन केले होते, तेव्हा अनेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. म्हणजे मोदींनी काही केले तरी विरोध आणि नाही केले तरी विरोध असला हा प्रकार होता. हा एक प्रकारे आयडिऑलॉजिकल जाँडिस झाल्याचेच विरोधकांनी दाखवून दिले, असे टीकास्त्र डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सोडले.

पण डॉ. विनय सहस्त्रबुध्दे एवढेच बोलून थांबले नाहीत. त्यांनी यावेळी शरद पवारांचे नाव घेतले. ते म्हणाले, की पुढे मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत. मागे संजय राऊत बसले होते. त्यांच्या मधल्या रांगेत शरद पवार बसले आहेत. पण या दोघांच्या मध्यभागी बसून सुध्दा त्यांनी आणि त्यांच्या कन्येने राजकीय समज दाखवून त्यावेळी टाळ्या आणि थाळ्या वाजविल्या होत्या.

शरद पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन दाखविलेल्या समजदारीची डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी जी प्रशंसा केली तिची चर्चा दुपारनंतर पार्लमेंटच्या परिसरात होती. विशेषतः काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उल्लेखासह त्यांनी पवारांचा उल्लेख केल्याने सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Dr. vinay sahasrabuddhe praise sharad pawar and his daughter supriya sule for “Tali and Thali”Dr. vinay sahasrabuddhe praise sharad pawar and his daughter supriya sule for “Tali and Thali”

महत्त्वाच्या बातम्या