महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमधील पाच आरोपींवर मंगळवारी (७ सप्टेंबर) आरोप निश्चित करण्यात येणार आहे.गेल्या आठ वर्षांपासून याबाबत न्यायालयीन सुनावणी सुरू असून अद्याप सुत्रधार फरार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमधील पाच आरोपींवर मंगळवारी (७ सप्टेंबर) आरोप निश्चित करण्यात येणार आहे.गेल्या आठ वर्षांपासून याबाबत न्यायालयीन सुनावणी सुरू असून अद्याप सुत्रधार फरार आहे. Dr. Dabholkar murder case, crime to be confirmed on Tuesday, hearing has been going on for the last eight years
या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. तर आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून . पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी खटल्याची पार्श्वभूमी सांगत शुक्रवारी आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची मागणी केली. आरोपींवर कोणत्या कलमांखाली आरोप निश्चिती करायची आहे. याबाबत।मंगळवारी सुनावणी होणार असून, त्यासाठी सर्व आरोपींना प्रत्यक्ष किंवा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आरोप निश्चितीला विरोध करताना तपास यंत्रणांच्या तपासावरच बचाव पक्षाने आक्षेप घेतला. बचाव पक्षातर्फे अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सीबीआयच्या दोषारोपपत्रात विसंगती असल्याचा युक्तिवाद केला.
20 आॅगस्ट 2013 रोजी अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सकाळी सात वाजेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते. पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App