नाशिकच्या आगरटाकळीत समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती मंदिरात भारतीय संविधान उद्दिष्ट्य प्रतिमेस अभिवादन!!

प्रतिनिधी

नाशिक : शंकराचार्य न्यास नाशिक संचालित धर्मजागरण ट्रस्ट तर्फे बालाजी मंदिरात आयोजित केलेल्या पूजा प्रशिक्षण वर्गात सहभागी आठ जिल्ह्यातील ४५ प्रशिक्षणार्थींनी नाशिक मधील धार्मिक स्थळांना भेट देत आगरटाकळी येथील गोमय मारुती मठास भेट देऊन श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते स्थापित केलेल्या गोमय मारुतीचे तसेच श्री समर्थ रामदास स्वामी १२ वर्ष ज्या गुहेत राहिले त्याचे दर्शन घेतले. त्याचवेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी संविधान उद्दिष्ट्य प्रतिमेस अभिवादन केले. Dr. Babasaheb Ambedkar jayanti, students pay respects to preamble of the constitution of india in samarth ramdas swami gomay maruti mandir

यावेळी त्यांनी मारुती स्तोत्र, मनाचे श्लोक याचे सामूहिक पठण केले. समर्थ भक्त ऍड. भानुदास शौचे यांनी विश्वस्त मंडळातर्फे स्वागत करून मठाची माहिती दिली. ज्योतिर्विद अनिल चांदवडकर व भेट देणारे प्रशिक्षणार्थी यांचे स्वागत केले.

महामानव भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त टाकळी मठातील संविधान उद्दिष्ट प्रतिमेस सर्वांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी रमेश कुलकर्णी गुरुजी सौ संगीता कुलकर्णी, जयेश कुलकर्णी ज्यो अनिल चांदवडकर आणि प्रशिक्षणार्थी , अनेक समर्थ भक्त उपस्थित होते.

Dr. Babasaheb Ambedkar jayanti, students pay respects to preamble of the constitution of india in samarth ramdas swami gomay maruti mandir

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात