राष्ट्रीय दुखवट्यात जयंत पाटलांकडून सांगली जिल्हा बँकेत पुरस्कार वितरण; धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्याने घड्याळाची वेळ चुकल्याची टिपण्णी!!

प्रतिनिधी

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर निमित्त राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसांचा दुखवटा असताना महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा बँकेत पुरस्कार वितरण सोहळा करून घेतला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात आणि राजकीय टिपण्णी देखील केली. धनुष्यबाण हाताच्या नादी लागल्याने घड्याळाची वेळ चुकली आहे, असे खोचक उद्गार त्यांनी काढले. वर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना माझे हे वक्तव्य छापू नका असेही सांगितले. आपण कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची वाट पाहात बसल्यामुळे कार्यक्रमाला यायला उशीर झाला. अन्यथा माझे आणि घड्याळाचे चांगले जमते. त्यामुळे मी कार्यक्रमाला वेळेवर येतो, असा टोला त्यांनी कदम यांना लगावलाDistribution of awards at Sangli District Bank by Jayant Patil in National Griefमात्र जयंत पाटलांनी राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात जिल्हा बँकेत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हाच मुद्दा पकडला असून लतादीदी या सावरकर भक्त होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा त्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय दुखवटा काळात देखील पुरस्कार वितरण सोहळा केला, असे टीकास्त्र भातखळकर यांनी सोडले आहे.

ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर देखील अनेक युजर्सनी पुरस्कार वितरण सोहळा या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जयंत पाटलांच्या राजकीय टिपण्णीवर देखील सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. जयंत पाटलांनी एकीकडे धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्याने घड्याळाची वेळ चुकली, अशी टिपणी केली असली तरी महाविकास आघाडी तीन घटक पक्ष एकत्र आल्याने सांगली जिल्ह्यात सहकार क्षेत्रात तिन्ही पक्षांची एकत्रित चांगली ताकद तयार झाली आहे, असा दावा केला आहे. या दाव्यानंतरही जयंत पाटलांच्या “घड्याळाची वेळ चुकली” या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Distribution of awards at Sangli District Bank by Jayant Patil in National Grief

महत्त्वाच्या बातम्या