भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्याच्या सावरकरांच्या मागणीकडे दिग्विजय सिंह यांचा काणाडोळा; गायीबाबतही सावरकरांचे विचार सांगितले अर्धवट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वीर सावरकर गोमांस खाणे चुकीचे मानत नव्हते; गायीला माता म्हणण्याला होता विरोध होता, असे वक्तव्य काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी केले आहे. हे खरे असले तरी हिंदूंची संख्या अधिक असल्याने ते हिंदुराष्ट्र घोषित करावे, अशी सावरकरांची मागणी होती, त्याकडे मात्र सिंह यांनी काणाडोळा केला आहे. सिंह यांनी गायीबाबत सावरकर यांचे विचारही अर्धवट मांडले आहेत.  सलमान खुर्शीद यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सिंह यांनी गायीबाबत सावरकारांचे अर्धवट विचार मांडले होते. Digvijay Singh’s ignors Savarkar’s demand to declare India a Hindu Nation; also expressed Partial thought of Savarkar on cows

सावरकरांनी नेमके काय सांगितले

सावरकर यांच्या मते गाय हा उपयुक्त पशु आहे. ती माता बैलाची किंवा त्याच्या वासराची होऊ शकते. मनुष्याची ती माता होत नाही. सावरकर विज्ञाननिष्ठ होते. काळाचा वेध घेणारी त्यांची दृष्टी होती.हिंदूंनी पोथीपुराणात अडकून न पडता आधुनिक विचारांची कास धरून बलाढ्य राष्ट्र निर्माण करावे, असे सांगितले होते.

गाईबाबतचे विचार मांडताना सावरकर यांनी इतिहासातील लढायांची उदाहरणे दिली होती. परकीय आक्रमक विशेषतः मुस्लिम हल्ले चढविताना हिंदुस्थानी हिंदू सैन्यासमोर गायीचे कळप सोडत असत. हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जात असल्याने आक्रमकांवर हल्ले चढविताना गायी मारल्या जातील या भीतीने हिंदू सैनिक शस्त्र उगारत नसत. याचा गैरफायदा उठवून आक्रमक हिंदू सैन्यावर हल्ला चढवून त्यांचा पराभव करत असत. नेमकी हीच गोष्ट सावरकरांनी ओळखली होती.



त्यावर ते भाष्य करताना म्हणाले, गाय ही तुमची माता नसून ती एक पशु आहे. कठीण प्रसंगी घाबरून मटकून बसणाऱ्या गायींपेक्षा गर्जना करणाऱ्या सिंहासारखे बळकट पायावर उभे असणारे राष्ट्र हवे आहे. नेमकी ही बाब दिग्विजय सिंह यांनी भाषणात वगळली आहे. सावरकर यांचे विचार त्यांनी अर्धवट मांडले आहेत.

गोमांस खाणे सावरकर चुकीचे मानत नव्हते, या सिंह यांच्या मुद्याचा विचार केला तर कोणी काय खावे, जे पचेल, रुचेल त्याने ते खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे सावरकर सांगत असत. गाय हा अन्य पशुप्रमाणे आहे. तिचे मांस कुणी खावे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, आधुनिक विज्ञानानुसार गायीचे मांस हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. गायीचे मांस खाल्ल्याने मॅडकाऊ हा रोग होतो, असे सिद्ध झाले आहे. गायीपासून दूध आणि त्यापासून दुग्धजन्य पदार्थ मानवासाठी उपयुक्त असल्याने तिला हिंदूंनी पुजले, मातेसमान मानले आहे. सर्वाधिक गायीची मांसासाठी हत्या अमेरीकेत होत असताना तेथे गोपालनही मोठ्या प्रमाणात होते, याकडेही सावरकरांनी लक्ष वेधले होते. गोमूत्र, गोमय आणि जानवे या चौकटीमध्ये हिंदू धर्म अडकवू नका, असेही त्यांनी बजावले होते. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था नष्ट करावी, या विचारांचे ते होते.

एखादी परकीय व्यक्ती हिंदू धर्म स्वीकारताना त्याला गोमूत्र- गोमय प्राशन करायला लावणे अवैज्ञानिक असल्याचे आणि हा प्रकार किळसवाणा आहे, असे सावरकरांनी सांगितले होते. गोमूत्राबाबत भाष्य करताना सावरकरांनी सांगितले होते. गोमूत्रात जर औषधी गुणधर्म असतील तर त्यावर संशोधन झाले पाहिजे. विशेष म्हणजे आधुनिक विज्ञानाने आता सिद्ध केले आहे की गोमूत्रात औषधी गुणधर्म असून ते मानवासाठी फायदेशीर आहे. परंतु दिग्विजय सिंह राजकीय सोयीसाठी सावरकरांचे गाईबाबत अर्धवट विचार मांडले आहेत.

सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार प्रथम मांडला होता. त्यांचे हिंदुत्व सर्वसमावेशक होते आणि आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी निगडित आहे. ते कोणत्याही धर्माचे असोत. पण, बहुसंख्य हिंदू देशात असताना त्यांना दुर्लक्षित करून अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम धर्मीय यांची तळी मतांसाठी उचळणाऱ्या आणि त्यांचे लांगून करणाऱ्या काँग्रेसच्या विचारसणीला त्यांचा प्रखर विरोधच होता. बहुसंख्य हिंदूंच्या छाताडावर नाचून मुस्लिमांचे लाड पुरविणाऱ्या प्रवृत्तीला त्यांनी प्रखर विरोध केला होता. बहुसंख्य हिंदू असलेले हिंदुराष्ट्र घोषित करण्याची मागणी त्यांनी केली होती. जर मुस्लिम बहुसंख्य असलेला देश मुस्लिम राष्ट्र आणि ख्रिश्चन बहुसंख्य असलेला देश ख्रिश्चन राष्ट्र बनते. मग बहुसंख्य हिंदू असलेला देश हिंदुराष्ट्र का बनू नये, हा सरळ प्रश्न त्यांचा होता. भारताची फाळणी ही धर्मावर केली होती. याचा त्यांना विसर पडला आहे.

हिंदू येथे पूर्वीपासून राहत आले आहेत. ती त्याची पुण्यभूमी आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन परकीय आहेत. अर्थात त्यांना हिंदूंनी सहिष्णुता दाखवून आपल्यात सामावून घेतले आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी हिंदूंच्या अधिकारावर गदा आणावी. घुसखोर तो घुसखोर वर शिरजोर या प्रमाणे वागू नये, असे त्यांचे रोखठोक मत होते.

सद्गुणविकृती टाळण्याचे हिंदूंना आवाहन

हिंदूंनी दुसऱ्या धर्माविषयी आदर बाळगावा. पण सदगुणाची विकृती करून स्वतःच्या धर्माचा नाश होणार नाही, याचाही विचार करावा, असा गर्भित सावरकर यांनी इशारा दिला होता. वाघ आणि पुजारी याची गोष्ट सांगताना त्यांनी सद्गुणविकृतीचे एक उत्तम उदाहरण दिले होते. ते म्हणतात ,पुजारी हा सदगुणी असल्याने त्याने मोदकांनी भरलेले ताट वाघ मोदक खाईल म्हणून नेले. परंतु वाघ हा मांसाहारी असल्याने त्याने मोदकाच्या ताटाकडे पाठ फिरविली आणि त्याने पुजाऱ्याला खाल्ले. म्हणजे पुजारी हाच वाघाचा मोदक ठरला. त्यामुळे आपल्या धर्मावर, राष्ट्रावर हल्ले चढविणारा आक्रमक आला तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्या. अन्यथा आक्रमक रुपी वाघापुढे सद्गुण दाखवून स्वतःचा नाश करून घेऊ नका, हा संदेश या गोष्टीतून सावरकरांनी दिला होता. या बाबीला त्यांनी सद्गुणविकृती असे संबोधले होते.

Digvijay Singh’s ignors Savarkar’s demand to declare India a Hindu Nation; also expressed Partial thought of Savarkar on cows

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात