वृत्तसंस्था
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शरद पवारांपेक्षाअधिक प्रगल्भ आहे. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.Devendra Fadnavis’s leadership is better than Sharad Pawar’s More Prolific: Gopichand Padalkar
मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर चार राज्यांच्या निवडणुकीतील यशाच्या सेलिब्रेशनवेळी पडळकर बोलत होते. गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पडळकरांनी फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना थेट शरद पवारांवर निशाणा साधला.
” विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका शरद पवारांकडे आहे असले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस हे परमेश्वरानं महाराष्ट्राला दिलेलं एक गिफ्ट आहे. ते तळहाताच्या फोडासारखं जपायचं हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी ठरवलं आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हाही ते २० तास काम करत होते आणि विश्वासघातानं विरोधी पक्षात गेले तरी ते लोकांसाठी २० तास काम करत आहेत”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App