शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यावरुनही भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत.Devendra Fadnavis to Nawab Malik; Said – NCP’s parrot is talking every day, isn’t it?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता.दरम्यान समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना जोरदार रंगला होता. तसेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यावरुनही भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत.
समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता.
मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मलिकांना टोला लगावला आहे.राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आमच्यासाठी नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App