राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याच्या भाकीतांवरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नुकतच त्यांनी एका मुलाखतीत बोलताना २०२४च्या निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असंही विधान केल्याचं समोर आलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. Devendra Fadnavis reaction on Ajit Pawars desire to become Chief Minister
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’मी त्यांची मुलाखत काही पाहीली नाही. कोणालाही आवडू शकतं मुख्यमंत्री व्हायला, आवडेल हे मला असं वाटतं काही वावगं नाही. अनेकांना असं आवडतं पण सगळ्यांनाच होता येतं असं नाही. ठीक आहे आमच्या शुभेच्छा आहेत.’’
Media interaction in #Nagpur pic.twitter.com/B9HenAQvdc — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 22, 2023
Media interaction in #Nagpur pic.twitter.com/B9HenAQvdc
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 22, 2023
याशिवाय राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असे मागील काही दिवसांत भाकीत व्यक्त केले जात होते, पण तुम्ही अगदी शांत होता? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘’ती सगळी भाकीतं पाहून, ऐकून माझंही मनोरंजन होत होतं. मनोरंजन घेत होतो मी.’’
त्या मूठीला इतक्या भेगा आहेत की… –
याचबरोबर ज्याप्रकारे अजित पवारांबद्दल संजय राऊत किंवा महाविकास आघाडीतून विरोध होत आहे, कुठंतरी असं चित्र दिसतय की अजित पवारांना महाविकास आघाडीतून ढकलण्यासाठी काही लोक आतूर झालेले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘’त्यांच्याकडे आत काय सुरू आहे, हे मला माहीत नाही. फक्त मी वारंवार जे सांगतोय की वज्रमूठ-वज्रमूठ ते जे म्हणत आहेत, त्या मूठीला इतक्या भेगा आहेत की वज्रमूठ कधी होऊ शकत नाही. त्याचाच प्रत्यय आपल्याला येतो आहे.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App