आळंदीत लाठीमार झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट खुलासा

प्रतिनिधी

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण होते. मात्र पोलिसांनी लाठीमार केल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. पण ती वस्तुस्थिती नाही. आळंदीत लाठीमार झालेला नाही, असा स्पष्ट खुलासा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. Devendra Fadnavis clearly disclosed that there was no caning in Alandi

वारी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झाला आहे. त्याचवेळी काही वारकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडली आणि मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलीस वारकऱ्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला.

या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे लाठीचार्ज झालेला नाही. तिथे थोडीफार बाचाबाची आणि झटापट झाली. 400-500 तरुण वारकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनाही थोडं लागलं आहे. आपण व्हिडिओ बघितले तरी तिकडे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. नंतर परिस्थिती शांत झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.

मागच्या वर्षीची स्थिती पाहता यावेळी बैठकीत मानाच्या दिंड्यांसाठी 75 पास देत आत सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून चेंगराचेंगरी होणार नाही, त्याप्रमाणे मानाच्या दिंडीचे लोक पोहोचले होते, इतर लोकांनी आत घुसण्याचा आग्रह केला आणि बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून निर्णय झाला होता. चुकीची घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis clearly disclosed that there was no caning in Alandi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात