प्रतिनिधी
सातारा : कोणत्याही काम न करता फक्त शब्दांचे खेळ करण्यात काही नेते माहीर असतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यात मधला पक्ष आहे. त्यांचे पार्सल कर्नाटकातून महाराष्ट्रात पाठवून द्या, अशी संभावना फडणवीसांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान केली होती. फडणवीसंच्या या टीकेला पवारांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील शरसंधान साधले. Devendra Fadanavis only knows word puzzle, targets sharad Pawar
देवेंद्र फडणवीस हे काही काम न करता शब्दांचे खेळ करण्यात माहीर आहेत. पण आम्ही आमचे काम करत राहू असे पवार म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून ते कायम अध्यक्ष राहिले. अशा अनेक सहकारी संस्था आहेत, त्यांच्या अध्यक्षपदी वर्षानुवर्षी पवारच आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वतःहून सोडणारच नाही, अशी टीका पुण्यात केली होती. त्यांच्या टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारला नव्हता. परंतु स्वतः शरद पवार यांनीच साताऱ्यात तो विषय काढला आणि आपण रयत शिक्षण संस्थेचे सभासदही नाही असा दावा केला. त्याचवेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याच काळात रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे आपण अध्यक्ष झालो, असे वक्तव्य केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरसंधान सांगताना शरद पवार म्हणाले आमच्या पक्षाची कॅटेगिरी काय?, हे त्यांनी पाहण्यापेक्षा खुद्द त्यांच्याच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांची कॅटेगिरी कोणती आहे? हे त्यांचे स्थान त्यांचेच सहकारी तुम्हाला खाजगीत सांगतील. जाहीर सांगणार नाहीत, असा टोला पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना हाणला.
एरवी आपण छोट्या नेत्यांवर टीकाटे पडणे करत नाही, असे पवार नेहमी सांगत असतात पण त्यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि पृथ्वीराज चव्हाण या महाराष्ट्र पातळीवरील प्रादेशिक नेत्यांवर पवारांनी शरसंधान साधले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App