राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान

प्रतिनिधी

मुंबई : पहाटेच्या नव्हे तर सकाळी आठ वाजताच्या देवेंद्र फडणवीस – अजित पवार शपथविधीच्या रहस्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना बोलणे भाग पाडल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला फडणवीस खोटे बोलले असे म्हणणारे पवार अखेरीस महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी हा शपथविधी झाल्याचे बोलून गेले. किंबहुना त्याचे “रहस्य” पवारांनी चिंचवड मधल्या पत्रकार परिषदेत उघड केले. फडणवीस – पवार शपथविधी झाला नसता, तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली नसती त्यामुळेच समझनेवाले को इशारा काफी है!!, असे वक्तव्य शरद पवारांनी चिंचवड मध्ये केले. Devendra Fadanavis challenges sharad Pawar to tell the truth about imposing president’s rule in maharashtra

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट उठली हे पवारांनी सांगितलेच आहे, पण मूळात राष्ट्रपती राजवट का लावली गेली?? ती कोणाच्या सांगण्यावरून लावावी लागली??, हे देखील शरद पवारांनी सांगून टाकावे म्हणजे सगळ्या कड्या जुळतील आणि सत्य सगळ्यांसमोर येईल, असे वक्तव्य फडणवीस यांनी पत्रकारांसमोर केले आहे.



सुरुवातीला शरद पवार तर फडणवीस – पवार शपथविधी बद्दल बोलायलाही तयार नव्हते. तो विषय झटकून टाकण्याकडेच त्यांचा कल होता. पण टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांचे नाव घेऊन त्यांच्याच पाठिंब्याने सकाळचा शपथविधी झाल्याचे ठामपणे सांगितले. त्यानंतर पवारांच्या वक्तव्या संदर्भातले सगळे चित्र बदलून गेले. सुरुवातीला शरद पवारांनी फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणी आहेत ते खोटे बोलतील, असे वाटले नव्हते असे म्हणून तो विषय झटकून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण फडणवीस मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. इतकेच नाही तर आपण अर्धे सांगितले आहे उर्वरित अर्धे नंतर सांगू असे ते म्हणाले होते.

त्यानंतर आजच्या चिंचवड मधल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच फडणवीस – अजित पवार यांचा शपथविधी झाल्याचे स्पष्टपणे सूचित केले. तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती. समझनेवाले को इशारा काफी है!!, असे शरद पवार म्हणाले. यातून सकाळच्या शपथविधीचे “रहस्य” तर उलगडलेच, पण पवारांनी भाजपला देखील फसविल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळेच आता फडणवीसांनी शरद पवार यांच्या चिंचवड मधल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना नवे आव्हान दिले आहे. राष्ट्रपती राजवट उठविण्यासंदर्भातले “रहस्य” तर शरद पवारांनी उलगडले, पण मूळात राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरून लावली??, हे देखील शरद पवारांनी सांगावे. ते त्यांच्याच तोंडून बाहेर येऊ द्या, असे वक्तव्य फडणवीस यांनी करून पवारांना पुढचे सत्य सांगायला भाग पाडले आहे. या लढाईत “एडव्हांटेज फडणवीस” झाले आहे!!

Devendra Fadanavis challenges sharad Pawar to tell the truth about imposing president’s rule in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात