शिवसेना आमदारांच्या राष्ट्रवादी विरोधात उघड तक्रारी तरीही मुख्यमंत्री गप्प!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आपल्या आमदारांना बळ देण्यासाठी ठाकरे पवार सरकार चा वापर करून घेत आहेत आणि शिवसेना आमदारांकडे दुर्लक्ष करताहेत निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे दुजाभाव करत आहेत अशा उघड तक्रारी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून आणि भेटून केले आहेत तरीही मुख्यमंत्री का गप्प आहेत याची आता शिवसेना आमदारांमध्ये चलबिचल आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. Despite open complaints of Shiv Sena MLAs against NCP, Chief Minister is silent !!

राज्यात शिवसेना – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारला लवकरच दोन वर्षे देखील पूर्ण होतील, मात्र तरी देखील या सरकारमध्ये आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले होते. कधी काँग्रेसची नाराजी तर कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेनेची नाराजी समोर आली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर पत्र लिहुन नाराजी व्यक्त केली होती. आता आणखी एक शिवसेना आमदार राष्ट्रवादीच्या मंत्र्यामुळे त्रस्त झाला असून, त्याने देखील थेट छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मात्र एकीकडे शिवसेनेचे आमदार नाराज असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच करत नसल्याची खंत शिवसेनेच्या आमदारांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी खासगीत बोलताना बोलून दाखवली.

मुंबई पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल देशमुख गृहमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांनी फणा उगारला होता. मग शिवसेना आमदारांच्या आमदारांची राष्ट्रवादीकडून कुचंबणा होत असताना मुख्यमंत्री आक्रमक का होत नाहीत याविषयी शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना तसेच तिथल्या आमदारांना कवडीची किंमत मिळत नसल्याची भावना सध्या शिवसैनिकांमध्ये आहे. ही बाब वारंवार शिवसेना आमदारांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना बोलून दाखवली. तसेच काही आमदारांनी चक्क मुख्यमंत्र्यांना भेटून तशा तक्रारी देखील केल्याचे समजते, मात्र तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? असा सवाल आता आमदार दबक्या स्वरात विचारू लागले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ आपल्या आमदारांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जात आहे. तसेच अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधी वाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात आहे. या सगळ्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितल्यानंतर खळबळ उडाली होती.

सुहास कांदे यांचा भाजपावर आरोप

भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केले. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले. अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा तपास पोलिस आयुक्त करतील. मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला भुजबळांच्या बाजूनं श्रीलंकेवरून धमकीचा फोन आला होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

याआधी प्रताप सरनाईक यांचे पत्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी  मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित शिवसेनेतील नेत्यांची नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी या पत्रातून केला होता. तसेच शिवसेना फोडण्याचा डाव या दोन्ही पक्षांनी मांडला असून, असे होत असल्यास आपण भाजपशी सूत जमवलेले बरे, असे त्यांनी या पत्रातून म्हटले होते.

Despite open complaints of Shiv Sena MLAs against NCP, Chief Minister is silent !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”