‘’मोदींचे फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी लाळघोटेपणा करतात, मग खरा फडतूस कोण?’’ असा सवालही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असं म्हटल्याने, आता राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसत आहे. भाजपाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. तर उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis strong response to Uddhav Thackerays criticism
प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. खरं म्हणजे माझा सवाल असा आहे, दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमतदेखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अडीच वर्षात घऱी बसून काम करणाऱअया व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भूई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही. ज्यादिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी पळता भूई थोडी होईल. त्यामुळे संयामाने बोला.’’
सर्वात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – आशिष शेलारांचे टीकास्त्र!
याशिवाय, ‘’सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, हा जो काही त्यांच थयथयाट आहे आणि हे जे काही त्यांचं नैराश्य आहे, या नैराश्यावर खरं म्हणजे काही उत्तर देण्याचं कारणच नाही. पहिल्यांदा तर हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, की मोदींचे फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी लाळघोटेपणा करतात, मग खरा फडतूस कोण? हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते कुठल्याही भाषेत बोलले असले, त्या पेक्षा खालची भाषा मला येते मी नागपूरचा आहे. पण मी तसं बोलणार नाही आणि तसं बोलण्याची माझी पद्धतही नाही.’’ असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.
याचबरोबर ‘’मी एवढंच सांगतो, या सगळ्या निमित्त की याचं उत्तर त्यांना जनता देईल. पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री मी राहिलो आहे आणि आता मी पुन्हा गृहमंत्री आहे. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्याने अनेकांना अडचणी होत आहेत. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत, की मला गृहमंत्री पद कसं सोडावं लागेल. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्री पद सोडणार नाही. तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि जो चुकीचं काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.’’ असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.
https://youtu.be/vy1z87lJ7I0
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –
“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App