येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.Deputy Chief Minister Ajit Pawar expressed anger over not wearing mask
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली.तसेच मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
पवार विधानसभेत म्हटले की, कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.काही गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुढे पवार म्हणले की , देशाचे पंतप्रधान हे कोरोना संदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत.काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App