छोटे ग्राहक वळले पुन्हा सोनेखरेदीकडे, सोन्याच्या मागणीत वाढ


विशेष प्रतिनिधी

मुंबई – छोटे ग्राहक पुन्हा सोनेखरेदीकडे वळल्याचे दिसत असून संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अजूनही फार मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू केलेली नाही, अशी माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिली आहे.Demand in Gold once again rising

एप्रिल ते जून या तिमाहीत जगात सोन्याची मागणी ९५५.१ टन होती, ही पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नऊ टक्के जास्त होती. मागील वर्षाच्या याच तिमाहीत ९६० टन सोनेखरेदी झाली.



एप्रिल ते जून या काळात छोट्या ग्राहकांनी सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांची २४३ टन खरेदी केली, तर एकूण ३९० टन सोन्याचे दागिने खरेदी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ही खरेदी ६० टक्के अधिक होती.

जून ते डिसेंबरदरम्यान सोन्याची जागतिक मागणी सोळाशे ते अठराशे टन राहण्याची शक्यता आहे. ही मागणी मागील वर्षीच्या तुलनेत जास्त; पण गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी आहे. जागतिक अर्थव्यवस्था पूर्ववत होत असताना मागणीही वाढत आहे, हे उत्साहवर्धक आहे

.तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणी मागील वर्षीच्या तुलनेत १८ टक्के वाढून ८० टनांवरगेली. गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (गोल्ड ईटीएफ) मध्ये दुसऱ्या तिमाहीत ४० टनांचेच व्यवहार झाले. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी या तिमाहीत सोनेखरेदी सुरूच ठेवली. या कालावधीत जगातील सरकारी सोन्याच्या ठेवी सुमारे दोनशे टनांनी वाढल्या.

Demand in Gold once again rising

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात