महाराष्ट्रात आता वाढतोय ‘डेल्टा प्लस’चा धोका, २४ जिल्ह्यांमध्ये १०३ रुग्ण; पाच जणांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर या विषाणूच्या ‘डेल्टा’ आणि आता ‘डेल्टा प्लस’ या नव्या प्रकाराचा विळखा वाढू लागला आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत १०३ रुग्ण आढळले असून त्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृतांमधील दोघांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले होते, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.Delta plus increasing in Maharashtra

राज्यातील निर्बंध शिथिलतेनंतर विशेषत: बाजारपेठांमधील गर्दी वाढली आहे. ६० टक्यांती हून अधिक व्यक्ती मास्कविना फिरत असल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात १३, रत्नागिरीत सर्वाधिक १५, कोल्हापूर जिल्ह्यात सात, ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोलीत प्रत्येकी सहा, नागपुरात पाच, नगरमध्ये चार, पालघर, रायगड, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग व नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण डेल्टा प्लस बाधित आढळला आहे.त्यापैकी रत्नागिरीतील दोन तर बीड, मुंबई, रायगडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. लस घेऊनही ‘डेल्टा प्लस’ची बाधा होत असल्याने बूस्टर डोसची गरज व्यक्तत केली जात आहे.

Delta plus increasing in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण