बनावट विवाहप्रमाणपत्र बनवून मागितली ३० लाखांची खंडणी
पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुलाचं बनावट विवाहप्रमाणपत्र बनवून तब्बल ३० लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार करण्यात येईल, अशी धमकी वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यास देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Death threat to son of MNS leader Vasant More in Pune
रुपेश मोरे सोमवारी रात्री ११ वाजता घरी जात असताना त्यास अनोळखी क्रमांकावरून महिलेच्या नावाने व्हॉट्सअप वर मेसेज आला होता. ज्यामध्ये रुपेशचे एका मुलीसोबत विवाह झाल्याची नोंदणी असलेले बनावट प्रमाणपत्र होते. प्राथमिक माहितीनुसार अल्पिया शेख या महिलेच्या नावाने मेसेज करण्यात आला होता व ३० लाखांची खंडणी मागण्यात आली होती.
मज्जा आहे बाबा एकाची!!, मनसे नेते संदीप देशपांडेंकडून उद्धव ठाकरेंच्या भावी पंतप्रधान पदाची खिल्ली
या प्रकरणी वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर, हे प्रकरण सायबर पोलिसांकडे सोपवलं गेलं आहे आणि सायबर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App