महाराष्ट्र बंद आंदोलनात रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसेनेकडून ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचे काही व्हीडिओ आता समोर आले आहेत. Dadagiri: Shiv Sena beats rickshaw pullers in Thane for not observing ‘Bandh’; The video that came out
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ राज्यातील ठाकरे-पवार सरकारने आज बंद पुकारला होता. पण यावेळी अनेकांना दुकानं आणि इतर गोष्टी बंद करण्यास भाग पाडलं जात होतं. त्याचवेळी दुसरीकडे ठाण्याच्या उपमहापौरांचे पती हे स्वत: रस्तावर उतरुन रिक्षा चालकांना चोप देत होते. याचे व्हीडिओ देखील व्हायरल होत आहेत.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या या बंदमध्ये शिवसेना कार्यकर्ते मात्र, जबरदस्ती करत असल्याचं यावेळी दिसून आलं. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उपमहापौरांचे पती पवन कदम हे स्वत: हातात काठी घेऊन रिक्षा चालकांना चोप देत असल्याचं आता विरोधकांकडून बोललं जात आहे. याचाच एक व्हीडिओ देखील आता समोर आला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर ठाण्यातील रिक्षा चालकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवन कदम त्यांनी तो प्रकार आपण नाही तर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांकडून घडला असून आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे . पण आपण बंदसाठी नव्हे तर रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याने त्यांना शिवसेना स्टाईलने समजवत असल्याचा अजब दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App