महापाैरांचे कार्यालयात शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे महापाैर कार्यालयात शिरुन शाईफेक केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या चार कार्यकर्त्यांवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पुन्हा एकदा रंगू लागले असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. crime registered against four persons..fake ink in pune mayor office


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महानगरपालिकेतील महापाैर मुरलीधर माेहाेळ यांच्या कार्यालयात, महापाैर कार्यालयात हजर नसताना अनाेळखी चार इसमांनी घाेषणाबाजी करत प्रवेश करुन सात मार्च राेजी शाई फेकल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात सुरेश विष्णु कदम (वय-३४,रा.सिंहगड राेड,पुणे) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर चार अनाेळखी व्यक्तीं विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. crime registered against four persons..fake ink in pune mayor office

 

तक्रारदार सुरेश कदम व त्यांचे सहकारी शुभम हिंगमिरे हे सात मार्च राेजी महापाैर कार्यालयाजवळ गार्ड डयुटीचे सरकारी कर्तव्य पार पाडत हाेते. त्यावेळी चार अनाेळखी इसमांनी आपआपसात संगनमत करुन महापाैर कार्यालयात हजर नसताना, त्यांच्या कार्यालयात शिरुन ‘वंचित बहुजन आघाडीचा विजय असाे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घाेषणाबाजी करुन महापाैरांची मानहानी करण्याचे उद्देशाने महापाैरांचे टेबलवर शाई टाकुन टेबल खराब व विद्रुप केला.

त्याचप्रमाणे कार्यालयाच्या बाहेरील बाेर्डालाही शाई लावून ताे खराब करुन पळुन जाताना सहकारी शुभम हिंगमिरे याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी झटापटी करुन त्याचे शर्टला शाई पुसून सदर दाेघांना सरकारी कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करुन आराेपी पळून गेल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस पुढील तपास करत आहे.

crime registered against four persons..fake ink in pune mayor office

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात