Covid 19 : मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह; गृह विलगीकरणात उपचार सुरू

प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रूग्ण वाढीचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक दिसत आहे. सर्वासामान्यांपासून ते अगदी मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Covid 19  Minister Shambhuraj Desai Corona Positive Treatment started in home isolation

शंभूराज देसाई यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘’माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो.’’ असं त्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही करोना संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते सध्या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. छगन भुजबळ यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनीही जे आपल्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे.

Covid 19  Minister Shambhuraj Desai Corona Positive Treatment started in home isolation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात