विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाने दणका दिला आहे. कारण त्यांनी , शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाच्या पोलिस चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. Court slaps Revenue Minister Abdul Sattar, false information in affidavit; orders for police inquiry
सिल्लोड सोयगाव विधानसभा १०४ निवडणूक सन २०१९ मधील नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले शपथपत्रामध्ये मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती सत्तर यांनी दिली. या प्रकरणी, डॉ. अभिषेक हरदास, पुणे व सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली, सिल्लोड यांनी दिनांक २७/१० /२०२१ रोजी सिल्लोड न्यायालयात न्यायमूर्ती एस, एस. धनराज यांच्याकडे संयुक्त याचिका दाखल केली होती. प्रकरणात कारवाई करून, अब्दुल सत्तार यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकून सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत पोलिस चौकशीचे आदेश बुधवारी दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App