ज्येष्ठ नागरिकाच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश


विशेष प्रतिनिधी

पुणे : मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण अधिकारी या पदावरून निवृत्त झालेल्या शशिकांत नलावडे (वय ८७, राहणार कोथरूड) यांची समाधान ज्ञानेश्वर कांबळे ( वारजे ) याने सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक केली होती. फसवणूक प्रकरणी तक्रारदार यांनी वकील हेमंत झंजाड व प्रदीप दिघे यांच्यामार्फत आरोपीवर ते गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी खटला न्यायालयात दाखल केला. Court orders filing of fraud case against senior citizen

आरोपी याने तो शेअर मार्केटमधील तज्ञ व्यक्ती असल्याचे भासवले. जर नलावडे यांनी शेअर मार्केटमध्ये दहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा वीस हजार रुपये तुम्हाला देईल व मुद्दल परत करेल असे लेखी करारनामा केला. तसे आश्वासन देऊन सदरची रक्कम स्वीकारली. त्यापोटी एकही रुपयांचा मोबदला न देता व तक्रारदार यांची कांबळे यांनी फसवणूक केली.फसवणूक प्रकरणी आरोपी कडे वेळोवेळी पैशांची मागणी करूनही आरोपीने तक्रारदार यांना एकही रुपया परत दिला नाही. तक्रारदार यांनी स्वतःच्या कुटुंबाला ही माहिती दिली नाही परंतु हा सर्व त्रास असह्य झाल्यामुळे शेवटी त्यांना न्यायालय मध्ये वकील हेमंत झंजाड व प्रदीप दिघे यांच्यामार्फत दाद मागितली.

तक्रारदार यांनी निवृत्ती नंतरचे सर्व पैसेही आरोपीच्या वर विश्वास ठेवून दिलेले आहेत. तर आरोपीने तक्रारदार यांना गुंतवणूक केलेल्या रकमेचा करारनामा करून देऊनही एकही रुपया परत केला नाही. तक्रारदार यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना पैशांची नितांत गरज आहे.

तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर आरोपी आणखीन अनेक लोकांची फसवणूक करेल.त्यामुळे त्याच्यावर ती त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा असा आदेश पारित करावा असा युक्तिवाद त्यांच्यावर केलेली हेमंत झंजाड यांनी न्यायालयात केला.न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी तक्रारदाराचे झंजाड यांचा युक्तिवाद मान्य करून आरोपीविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोथरूड पोलिसांना दिले.

Court orders filing of fraud case against senior citizen

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती