कपाशीला चक्क काकडी ; ही व्हायरल बातमी खोटीच अंतुर्ली येथील शेतकऱ्यांकडून स्पष्ट


 

जळगाव : गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर कपाशीच्या झाडावर काकडी लागल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. मात्र, आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जाऊन हकिकत जाणून घेतली. तेव्हा ही बातमी खोटी असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.Cotton cucumber This viral news is false Clear from the farmers at Anturli

अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथील शेतकरी नितीन दादाजी पाटील यांच्या शेतातील कपाशी झाडाला चक्क काकडी लागल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.याबाबत प्रश्नांचा भडिमार झाल्याने नितीन दादाजी पाटील व त्यांच्या परिवाराला ही बाब मोठी डोकेदुखी ठरत आहे. आमच्या प्रतिनिधीने बातमीची शहानिशा केली. तेव्हा ही बातमी सपशेल चुकीची असल्याचे उघड झाले.

  • कपाशीला चक्क काकडी लागल्याची बातमी खोटीच
  • गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर बोभाटा
  • शेतकऱ्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला
  • प्रतिनिधीकडून घटनास्थळी पाहणी
  • बातमी खोटी असल्याचे झाले उघड

Cotton cucumber This viral news is false Clear from the farmers at Anturli

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था