शिवभोजन योजनेत भष्ट्राचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अपमान – देवेंद्र फडणवीस

Corruption in Shivbhojan Yojana, big insult to Chhatrapati Shivaji Maharaj says Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकूणच ठाकरे-पवार सरकारला घेरण्यासाठी विरोधकांच्या भात्यात कोणकोणते मुद्दे आहेत, याचा पाढाच त्यांनी माध्यमांसमोर वाचला. यावेळी त्यांनी कोरोना काळातील भष्ट्राचार, शिवभोजन योजनेतील भष्ट्राचार, अधिकाऱ्यांचं वसुलीचं टार्गेट, प्रस्ताविक कायदे, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. Corruption in Shivbhojan Yojana, big insult to Chhatrapati Shivaji Maharaj says Devendra Fadnavis


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हेही अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकूणच ठाकरे-पवार सरकारला घेरण्यासाठी विरोधकांच्या भात्यात कोणकोणते मुद्दे आहेत, याचा पाढाच त्यांनी माध्यमांसमोर वाचला. यावेळी त्यांनी कोरोना काळातील भष्ट्राचार, शिवभोजन योजनेतील भष्ट्राचार, अधिकाऱ्यांचं वसुलीचं टार्गेट, प्रस्ताविक कायदे, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला.

शिवभोजन योजनेबाबत फडणवीस म्हणाले की, शिवथाळी हा जो काही उपक्रम आहे, हा सत्ता पक्षातल्या विशेषत: शिवसेनेच्या काही नेत्या कार्यकर्त्यांना त्यांचा व्यवसाय चालू करून देण्याकरिता उत्पन्नाचे साधन म्हणून सुरू केल्याचे आता समोर आले आहे. एकतर शिवथाळीची व्याप्ती मोठी नाही आहे, ज्याप्रमाणे सगळ्या गरिबांकरिता, ती परिस्थिती नाहीये. आणि जी काही व्याप्ती आहे तेथे खोटी नावे टाकणे, तीच ती नावे टाकणे, लहान मुलांना ज्यूस पाजून फोटो काढणे, हे माध्यमांतून आलेलं आहे. हा महाराजांचा अपमान नाही का? शिवथाळी महाराजांच्या नावाने तुम्ही चालवता आणि यात असा भ्रष्टाचार करता? यावर कारवाई झालीच पाहिजे, आम्ही मागणी करू!

ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या नावावर झालेला भ्रष्टाचार आम्ही बाहेर आणणार आहोत. माध्यमांनीही कोरोना मृत्यूची आकडेवारी बाहेर काढली आहे. कोरोनाचं गौडबंगाल आहे. कोरोनाच्या नावाने कोणी कोणी चांगभलं केलं ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करू. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. तीही बाहेर आणू. मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार आणि कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर आणू.

Corruption in Shivbhojan Yojana, big insult to Chhatrapati Shivaji Maharaj says Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात