गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना; अनेकांनी घेतले होते लसीचे दोन डोस


वृत्तसंस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना झाल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर व अन्य भागांतून हे भक्त कोकणात गेले होते. अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. Corona virus infection to 272 people who went to konkan for ganeshotsav

गणेशोत्सवानिमित्त सुमारे दोन लाख १७ हजारांहून अधिक गणेशभक्त कोकणात गेले होते. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी आहे, असे आकडेवारीवरून दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ३० हजार जण आले होते. त्या पैकी ९० हजार जण कोरोनाची चाचणी करून आणि लसीचे दोन डोस घेऊन आले होते.४० हजार जण चाचणीसाठी पात्र होते; परंतु त्यातील साधारण  २० हजार जण १८ वर्षांखालील होते, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली. उर्वरित २० हजार जणांपैकी १२० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्याव्यतिरिक्त ७२ जणांना कोरोनासदृश लक्षणे होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

रेल्वे, एसटी, खासगी वाहनांतून ८७ हजार ८३७ जण उत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यातील ३० हजार २१६ जणांनी लसीचे दोन डोस घेतले होते. २० हजार जणांचे कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आले. जिल्ह्यात आठ हजार १०४ जण तपासणी न करताच आले. त्यांची आरोग्य चाचणी केली तेव्हा १५२ जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले.

Corona virus infection to 272 people who went to konkan for ganeshotsav

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण